जळगाव प्रतिनिधी :- दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सेंट टेरेसा कॉन्व्हेंट हायर सेकंडरी स्कूल, जळगाव येथील विद्यार्थिनी ज्ञानदा महालपुरे हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे शाळा, पालक व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानदा ही गणेश महालपुरे यांची कन्या असून अत्यंत मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जात असून ज्ञानदाने आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकवृंदांनी ज्ञानदाचे विशेष अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीही मुलीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून तिच्या परिश्रमाचे हे यशस्वी फळ असल्याची भावना व्यक्त केली.
ज्ञानदा महालपुरे हिच्या या दैदिप्यमान यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सेंट टेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल विद्यार्थिनी ज्ञानदा महालपुरेची दहावीमध्ये शंभर टक्के यशाची अभिमानास्पद कामगिरी..
RELATED ARTICLES
