Monday, April 13, 2026
Homeजळगांव शहरसुरभी तर्फे चैत्रगौर हार्दिक कुंकू निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

सुरभी तर्फे चैत्रगौर हार्दिक कुंकू निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
सुरभी तर्फे चैत्रगौर हार्दिक कुंकू निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन श्री सिद्धिविनायक मंदिरात चैत्रगौर हळदी कुंकवा निमित्त सुरभी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सुरुवातीला बहुभाषिक महिला संघाच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुधाताई खटोड अध्यक्ष सौ पूनम तिवारी श्रीमती लताताई झवर यांच्या हस्ते गौरीचे पूजन करण्यात आले.संस्थापक अध्यक्ष सुधाताई खटोड यांनी १९ तारखेला श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.अध्यक्ष सौ स्वाती कुलकर्णी यांनी उन्हापासून काळजी घेण्याचे व पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले सौ वैशाली ढेपे व सौ आसावरी जोशी यांनी निबंध वाचन केले ह्यावेळी सरप्राईज प्रश्न व फिश पॉइंट स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन मानसी जोशी यांनी केले नीलिमा नाईक,अश्विनी जोशी,ज्योती भोकरडोळे, सविता नाईक,अविता जोशी,पुनम जोशी,प्रज्ञा जोशी, संजीवनी नांदेडकर व सिद्धिविनायक मंदिर महिला मंडळ ह्यांचे सहकार्य लाभले.

सर्व उपस्थित महिलांनी फिशपॉंड स्पर्धेचा आनंद घेतला. कैरीची डाळ व पन्ह्याच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.फिशपॉंड स्पर्धेत वैशाली ढेपे, अनघा दाणी, अनुप्रीता बापट, ललिता टिपरे, ज्योती प्रकाश कुलकर्णी यांना बक्षिसे मिळाली तर सरप्राइज बक्षिसे प्रार्थना महाजन,दीपाली कुलकर्णी,अमिता जोशी, शुभांगी जोशी,स्नेहा जोशी यांना मिळाली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या