Saturday, September 12, 2026
Homeजळगांव शहरश्रृंग ऋषि जयंती निमित्त भव्य मोटरसायकल रॅली..

श्रृंग ऋषि जयंती निमित्त भव्य मोटरसायकल रॅली..

जळगांव – दि.९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)श्रृंग ऋषि जयंती निमित्त सिखवाल ब्राह्मण समाज तर्फे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बुधवार दि.९ रोजी सायंकाळी पाच वाजता मोटार सायकल रॅलीचे उत्साहपूर्ण आयोजन सिखवाल ब्राह्मण समाजा तर्फे करण्यात आले होते.या मोटर साइकिल रॅलीत युवक,युवती,पुरूष,महिला मोठ्या संख्येने आपल्या वाहनावर सहभागी झाले होते.
श्रृंग ऋषि मंदिर (इंद्रप्रस्थ नगर) पासून संध्याकाळी ५ वाजता रॅलीला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.मोटर साइकिल रॅली मार्गक्रमण करीत श्रृंग ऋषि मंदिर,राजाराम मंगल कार्यालय, कानळदा रोड,लाकुड पेठ,शिवाजी नगर चौक,जूनीदाल फड,श्री मोटर,शिवाजी नगर वैकुंठ धाम,शनिपेठ भिलपुरा चौक,महर्षी दधीची चौक,बालाजी मंदिर,रथ चौक,नेरी नाका,राणी झाशी चौक,बी जे मार्केट,बालगंधर्व नाट्यगृह मार्गे मॉडर्न गर्ल्स हायस्कूल येथे रॅली समाप्ती करण्यात आली.कार्यक्रम यशस्वितेसाठी गोपाल पंडित दिलीप सिखवाल,चंदू पंडित,केशव पंडित,चेतन तिवारी मनीष ओझा,निलेश व्यास,राहुल व्यास,बंसी महाराज ब्यास,कमलाबाई पांडे,उषा सिखवाल,चंदा व्यास, भारती ओझा आदींनी परिश्रम घेतले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या