Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरश्री साईबाबा मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त श्री.गणपतीअथर्वशीर्ष २१ आवर्तन सोहळा संपन्न..प्रत्येक...

श्री साईबाबा मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त श्री.गणपतीअथर्वशीर्ष २१ आवर्तन सोहळा संपन्न..प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आयोजन..

जळगांव – दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील बळीराम पेठ परिसरात दर संकष्ठ चतुर्थीला श्री साईबाबा मंदिर,बळीराम पेठ,जळगावच्या माध्यमातून येथे”श्री गणपती अथर्वशिर्ष २१ चे आवर्तन” हा कार्यकम साजरा होत असतो.

आज दि १६ मे शुक्रवार रोजी श्री.दिलीप पुरुषोत्तम चौधरी,सौ.आशा दिलीप चौधरी व श्री.अश्विन प्रमोद सोनार,सौ.श्रद्धा अश्विन सोनार ह्या दोन्ही दांम्पत्यांच्या हस्ते श्री गणपती बाप्पाचा अभिषेक मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होती.पुढील श्री गणेश २१ आवर्तन सोहळा व अभिषेक कार्यक्रम १४ जुन २०२५ शनिवार रोजी आयोजिला आहे.तरी ज्या दाम्पत्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी श्री साईबाबा मंदिर बळीराम पेठ येथे संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या