Friday, June 5, 2026
Homeजळगाव ग्रामीणश्री क्षेत्र विदगावात श्री संत नामदेव बाबा शिरागडकर अनुग्रहीत बाल संस्कार शिबिर...

श्री क्षेत्र विदगावात श्री संत नामदेव बाबा शिरागडकर अनुग्रहीत बाल संस्कार शिबिर आयोजन.. दि २६ एप्रिल ते १६ मे दरम्यान आयोजन..

विदगाव- दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) श्री संत नामदेव बाबा शिरागडकर अनुग्रहीत बाल संस्कार शिबिर श्री क्षेत्र विदगाव ता जि जळगाव येथे कालावधी दि २६ एप्रिल ते १६ मे दरम्यान आयोजैत करण्यात आले आहे.पुढील पिढीला संस्कार मिळावेत यासाठी हा सुंदर उपक्रम राबवला जात आहे.या घोर कलियुगात मानवी जिवनात संस्कार मिळावे म्हणून श्री गुरु नामदेव बाबा शिरागडकर यांच्या अनुग्रहाने येत्या ५ वर्षा पासुन बाल संस्कार शिबिराच आयोजन केले जात आहे.मुख्य उद्देश मुलांना चांगले सुसंस्कार मिळावे,त्यांच्या हातुन वैदिक सनातन धर्माच पालण व्हावे,वारकरी चाली,पखवाज वाजवणे लहान मोठ्याचा आदर करणे असे हे संस्कार फक्त बाल मनावरच होऊ शकतात म्हणून बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले जात आहे. या बाल संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांला फि नाही आणि शिक्षकाला पगार नाही, वारकरी संध्या,आणि चाली शिकवण्यासाठी हरी महाराज आवारकर परीश्रम घेत आहेत,पखवाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी श्री रोहित महाराज भोलाणेकर सेवा देत आहेत.आणि पाठांतर योगासने घेण्यासाठी श्री दिपक महाराज शिंदखेडराजा हे मंडळी उपस्थित आहे विषेश करुन विदगावकर भजनी मंडळ याचे अनमोल सहकार्य या शिबिरासाठी लाभत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या