Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरश्रावणाच्या पहिल्या दिवशी वटकेश्वर महादेव मंदिरात शिवशक्ती कथक संस्थेची नृत्यसेवा

श्रावणाच्या पहिल्या दिवशी वटकेश्वर महादेव मंदिरात शिवशक्ती कथक संस्थेची नृत्यसेवा

जळगाव :- दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी वटकेश्वर महादेव मंदिर येथे शिवशक्ती कथक संस्थेच्या वतीने भक्तिमय नृत्यसेवेचे आयोजन करण्यात आले. भगवान शिवाच्या चरणी कथक नृत्याच्या माध्यमातून ही सेवा अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात‘सिंदूर लाल चढायो’या गणेशवंदनेने झाली.त्यानंतर‘रखुमाई’,‘जयकाल महाकाल शंभो’ ,‘ओ कान्हारे’,‘अच्युतम केशवम्’,‘नमामि शमीशान’,‘अवघा रंग एक झाला’,‘श्रीरंगा विठ्ठला’ तसेच‘जय जय जननी देवी’अशा विविध भक्तिमय रचनांवर कथक नृत्य सादर करण्यात आले.

श्रावणाच्या पवित्र प्रारंभानिमित्त सादर झालेल्या या नृत्यसेवेमुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. नृत्य, संगीत आणि भक्ती यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

या नृत्यसेवेत पूजा कुलकर्णी, अनुष्री सावकारे, कृष्णाई रेंभोटकर,श्रावणी वरणकर, प्राजक्ता सूर्यवंशी आणि जिग्नेशा लोखंडे या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिवशक्ती कथक संस्थेच्या विद्यार्थिनींनी कथक कलेच्या माध्यमातून भक्तीची अभिव्यक्ती सादर करत श्रावणाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अधिक मंगलमय केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या