Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरशेठ ला. ना. सा.विद्यालयात "सखी सावित्री :महिला तक्रार निवारण समितीचे उद्घाटन

शेठ ला. ना. सा.विद्यालयात “सखी सावित्री :महिला तक्रार निवारण समितीचे उद्घाटन

जळगाव – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात नुकतेच सखी सावित्री समिती,महिला तक्रार निवारण समिती तसेच माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित मनोमंथन या प्रबोधनात्मक उपक्रमात “सखी सावित्री:महिला तक्रार निवारण समितीचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध समुपदेशक सौ.श्वेता जैन,शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयिका श्रीमती रजनी पाठक,सौ.लता छापेकर,शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,पर्यवेक्षिका सौ रमा तारे,पर्यवेक्षक श्री जगदीश साळुंखे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले
या प्रसंगी प्रमुख अतिथी तथा समुपदेशक सौ .श्वेता जैन यांचे स्वागत शाळेच्या समन्वयिका श्रीमती रजनी पाठक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.या प्रसंगी समुपदेशक सौ श्वेता जैन यांनी एल. सी.डी. प्रोजेक्टर व स्लाईड द्वारे उपस्थित विद्यार्थिनी व त्यांच्या पालिका यांना मार्गदर्शन करतांना शिस्त, मनोबल ,ध्यानधारणा म्हणजे काय,ध्यानधारणा कशी करावी,ध्यानधारणेचे फायदे,विद्यार्थिनी व महिलांच्या समस्या व त्यांचे निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच मेडिटेशनचे सामूहिक प्रात्यक्षिक करून घेतले. या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती रजनी पाठक यांनी विद्यार्थिनींना उत्तम चरित्र व सुयोग्य वर्तन याबाबतीत बहुमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ प्राजक्ता गोहिल तर प्रमुख अतिथींचा परिचय सौ रोहिणी प्रचंड यांनी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेवती किन्हीकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ मधुश्री मदाने यांनी केले .यावेळेस विद्यार्थिनी व माता पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या