Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरशेठ ला. ना. सा.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप यांना सेवापूर्ती निम्मित भावपूर्ण...

शेठ ला. ना. सा.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप यांना सेवापूर्ती निम्मित भावपूर्ण निरोप

जळगाव – दि.९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप हे शुक्रवार दिनांक ३१ जुलै रोजी आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना संस्था व शाळेतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरवातीस सत्कारमूर्ती श्री.प्रशांत जगताप सौ.सारिका जगताप,शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,पर्यवेक्षक संजय वानखेडे,सौ.रमा तारे, आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

यानंतर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत जगताप व सौ.सारिका जगताप यांचा शाळेतर्फे व संस्थेतर्फे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थेचे विश्वस्त प्रेमचंद ओसवाल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे,सचिव अभिजीत देशपांडे ,ज्येष्ठ संचालक प्रा.शरच्चंद्र छापेकर सहसचिव सौ.मिरा गाडगीळ,मुख्य समन्वयिका सौ पद्मजा अत्रे,संचालक ॲड.पंकज अत्रे,सौ.प्रिया देशपांडे,श्रीमती मंगला दुनाखे,आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी ग.स.पतपेढीच्या अध्यक्षा सौ.रागिणी चव्हाण व संचालक मंडळातर्फे शाल,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळेस प्रशांत जगताप सर यांच्या मातोश्री,कन्या,जावई,मुलगा,बहिणी,मेहुणे,भाऊ,मित्रमंडळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी शाळेतील सेवानिवृत्त तसेच विद्यमान शिक्षकांनी देखील त्यांचा वैय्यतीक सत्कार केला.या वेळेस शाळेतील शिक्षक जगदीश साळुंखे,सोमनाथ महाजन,आनंदा चौधरी,आनंद पाटील,नितीन कोष्टी,संपदा तुंबळे,सुरेश कुलकर्णी,श्रीकांत घुगे,सुभाष पाटील,श्रुती जगताप, अनिल पाटील,पर्यवेक्षक संजय वानखेडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून त्यांचा शांत स्वभाव,उत्तम नियोजन, अभ्यासू वृत्ती,आदर्श क्रीडा मार्गदर्शक ,उपक्रमशीलपणा ,कल्पकता आदी गुणांचा गौरव केला.या प्रसंगी सत्कार मूर्ती उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप सर यांनी संस्था,शाळा व सहकारी ,कुटुंबीय यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

तसेच या पुढेही क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहण्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक  सचिन देशपांडे यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून त्यांना निरामय,सुखी ,समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सौ.वृषाली पाटील यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या