Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरशिवशक्ती कथक संस्थानतर्फे समर्थ रामदास ट्रस्ट येथे नृत्यसेवा

शिवशक्ती कथक संस्थानतर्फे समर्थ रामदास ट्रस्ट येथे नृत्यसेवा

जळगाव :- दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
श्री समर्थ रामदास ट्रस्ट, जळगाव येथे शिवशक्ती कथक संस्थानतर्फे भक्तिमय नृत्यसेवेचे आयोजन करण्यात आले. विविध भक्तिगीतांवर आधारित कथक नृत्याचे सुंदर सादरीकरण विद्यार्थिनींनी केले.

या नृत्यसेवेत गणपती, देवी, महादेव तसेच विठ्ठल-रुक्माई यांच्या भक्तिमय गीतांचा समावेश होता. भारतीय शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून भक्तीभाव व्यक्त करत विद्यार्थिनींनी केलेल्या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या नृत्यसेवेत पूजा कुलकर्णी, अनुष्री सावकारे, स्वरा चौधरी, श्रावणी वरणकर आणि प्राजक्ता सुर्वंशी या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी भाव, ताल, लय आणि पदन्यास यांचा सुंदर मिलाफ साधत भक्तिमय वातावरण निर्माण केले.

शिवशक्ती कथक संस्थानच्या माध्यमातून विद्यार्थिनींना केवळ कथक नृत्याचे प्रशिक्षण न देता भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि भक्ती यांचा नृत्याच्या माध्यमातून अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. समर्थ रामदास ट्रस्ट येथे सादर करण्यात आलेली ही नृत्यसेवा त्याच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वाटचालीतील एक सुंदर उपक्रम ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या