Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरशिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे जयंती निमित्ताने शाळेतील १०० गरजू...

शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे जयंती निमित्ताने शाळेतील १०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप..

जळगाव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै. अ.वा.अत्रे यांच्या जयंती निमित्त शाळेतील १०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पाठ्यपुस्तक संच (इ. ९ वी व १० वी) तसेच वह्या वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे,संस्थेचे सचिव अभिजित देशपांडे,संस्थेचे ज्येष्ठ सभासद पारसमल कांकरिया,तसेच माजी विद्यार्थी डॉ.अनुप दंडगव्हाळ,जयेश कुलकर्णी,मुख्याध्यापक सचिन देशपांडे ,ज्येष्ठ पर्यवेक्षक प्रशांत जगताप,संजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी पर्यवेक्षक प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात स्व.ॲड.अत्रे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा आढावा सादर केला.यावेळेस संस्थेचे ज्येष्ठ सदस्य पारसमल कांकरिया यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप साठी देणगी देण्यात आली, तसेच शाळेचे लिपिक श्री.पराग महाशब्दे यांनी ११,००० रुपये किंमतीची शैक्षणिक पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली,शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.प्राजक्ता गोहिल ,सौ.कविता कुऱ्हाडे ,सोमनाथ महाजन,हितेंद्र जोशी,योगेश सोनजे,श्रीकांत घुगे यांनी वह्या आणि गणवेश वाटप साठी देणगी दिली.तसेच शाळेच्या मार्च १९९९ च्या इयत्ता १० वी च्या बॅच तर्फे शाळेतील क्रीडा शिक्षक उल्हास ठाकरे यांच्या पुढाकाराने इ.९ वी,१० वीच्या गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकसंच,गणवेश देण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशील अत्रे यांनी आपल्या मनोगतात स्व.ॲड.अ. वा.अत्रेंचा संदेश विद्यार्थ्यांना दिला,`बाळांनो,खूप शिका,खूप मोठे व्हा,`या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ स्मिता करे व आभार प्रदर्शन पंकज महाले यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या