Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरशाहू नगर परिसरातील हौसिंग सोसायटीत महिलांनी केले वृक्ष रोपण..

शाहू नगर परिसरातील हौसिंग सोसायटीत महिलांनी केले वृक्ष रोपण..

जळगांव – दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहर हरित व्हावे,पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने हाउसिंग सोसायटीमध्ये माझे शहर माझी जबाबदारी या अभियान अंतर्गत परिसरातील जागृत महिलांनी जनजागृती करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला एकूण २५ वृक्ष लावण्यात आले.या साठी डॉ.लीना पाटील यांनी पुढाकार घेत त्यांच्या सौजन्याने हा प्रेरणादायी उपक्रम राबवला.या उपक्रमाला यशस्वी करण्याकमी डॉ लीना पाटील,भाजप महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी,वंदना सुर्यवंशी,राजू पवार,तुषार कोल्हे,शैला चव्हाण,नम्रता शर्मा,वंदना भावसार, सविता जगताप,सोनाली पवार,कुंदा पाटील,वंदना सूर्यवंशी,साधना जगताप,मनीषा राजपूत,वैशाली दीक्षित,सुचिता राणे,जुई कलभांडे,जिल्हा केमिस्ट संघटना व निसर्ग मित्र ग्रुपचे पदाधिकारी विलास बर्डे,आदींनी सक्रिय सहभागी होवून योगदान दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या