Sunday, September 13, 2026
Homeजळगांव शहरशब्दहोत्री कवितांचा संग्रह उद्या प्रकाशन सोहळा

शब्दहोत्री कवितांचा संग्रह उद्या प्रकाशन सोहळा

जळगाव- दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे व अ‍ॅड. शुभंकर अत्रे या पिता-पुत्रांच्या कवितांचा संग्रह शब्दहोत्री, रसिकांच्या साक्षीने प्रकाशन सोहळा दि.२४ एप्रिल सायंकाळी ७ वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, ला.ना.शाळा आवार,जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.शब्दहोत्री या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशन श्रीमती प्रतिमा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त याच काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांच्या वाचनाचा कार्यक्रमही रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहेत. काव्यवाचन प्रिया देशपांडे व सोनिका मुजूमदार ह्या करणार आहे. या संयुक्त कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे व स्मरणरंजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या