Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरव.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहाचे लवकरच नूतनीकरण करणार - अशोक जैन...व.वा.वाचनालय पथाच्या नामफलकाचे अनावरण..

व.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहाचे लवकरच नूतनीकरण करणार – अशोक जैन…व.वा.वाचनालय पथाच्या नामफलकाचे अनावरण..

जळगाव – दि.१५ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क)दीडशे वर्षांची वाटचाल करणाऱ्या व.वा. वाचनालयाच्या ऐतिहासिक लोकमान्य टिळक सभागृहाचे भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे लवकरच नूतनीकरण करण्याचा मनोदय जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला.नवीपेठ येथील व.वा. वाचनालय पथ फलक अनावरणानंतर वाचनालयाला दिलेल्या भेटीत ते बोलत होते.या कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची प्रमुख अतिथी म्हणून तर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी बोलताना अशोक जैन यांनी व.वा. वाचनालयाशी संबंधित बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. वाचनालयाची दीडशे वर्षांची वाटचाल ही एक महत्त्वाची घटना असून याबद्दल केंद्र सरकारकडून विशेष टपाल तिकिटासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले.माझ्या जडणघडणी मध्ये पुण्यातील जयकर लायब्ररीचा मोठा वाटा असून त्यापेक्षाही हे वाचनालय अधिक समृद्ध आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी प्रतिपादन केले. आयुक्त आदित्य जीवने यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रारंभी विद्या विकास प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लेझीमच्या उत्साहात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. पालखीत भारतीय संविधान आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ ठेवण्यात आले होते.वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित रोटरी महावाचन अभियानाला महापौर दीपमाला काळे यांच्या सह सर्व मान्यवरांनी भेट दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या