जळगांव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) वैश्विक पूर्वाभ्यास दिन ३ जुलै रोजी जगभरात उत्साहात साजरा होणार असून गुरूवार दि. ३ जुलै २०२५,सकाळी ६.०७ ते ६.२८ पर्यंत (२१मिनिटे) आपापल्या ठिकाणची स्थानिक वेळ पाळून प्राणशक्तीची आराधना करून ध्यान धारणेतून अनुभूती घेवून साजरा करावा.

सर्वांच्या कल्याणसाठी व मनःशांती साठी महायोग (सिद्धयोग) या मार्गाचा जगभर प्रसार प्रचार प.पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांनी केला. अशी ही ध्यान धारणेची अनुभव घेण्यास सोपी, बिनखर्चाची आणि स्वतःच्या प्राणशक्तिची आराधना करणारी पद्धत जात, धर्म, पंथ, लिंग इ. भेदभाव न बाळगता अनुभवता यावी यासाठी महायोगाचा (सिद्धयोगाचा) पूर्वाभ्यास सर्वांनी खालीलप्रमाणे आपल्या घरी करण्याचे आवाहन प.पू.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट, नाशिक मुख्य केंद्र यांच्या वतीने केले आहे.
ध्यान धारणेची पद्धतःशांतपणे डोळे मिटून बसावे,शरीर अधिकाधिक ढिले सोडावे ,आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासावर लक्ष ठेवावे,आपोआप होणाऱ्या क्रियांना स्वातंत्र्य द्यावे, सर्वात महत्वाचे म्हणजे, या मार्गात आपण स्वतः काहीही करावयाचे नाही.या अभ्यासामुळे हळूहळू अंतःकरण शुद्धी होऊन मनःशांती, ताण तणावातून मुक्ती,एकाग्रता वाढणे इ. प्रकारचे फायदे अनुभवास येऊ शकतात. कृपया जास्तीत जास्त जणांनी याचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी www.mahayoga.org येथे भेट द्यावी.अधिक व्यक्तींना लाभ व्हावा या साठी हा संदेश जळगाव जिल्हाभरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन प.पू.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट,नाशिक मुख्य केंद्र संचलित जळगाव येथील महायोग (सिद्ध योग) साधना केंद्राच्या वतीने केले आहे.अधिक माहिती साठी जळगाव केंद्राच्या या ९१५८८७२४४७ संपर्क क्रमांका वर संपर्क साधावा.
