जळगांव – दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितातील सर्वात दैदिप्यमान सुवर्णपान म्हणजे गणेशोत्सव,आणि या उत्सवाचा जणू प्राणवायू म्हणजे आसमंत निनादवून सोडणारा ढोल-ताशांचा गजर! मात्र,यंदाचा हा वाद्यपूजन सोहळा केवळ एका परंपरेची पुनरावृत्ती नसून,सामाजिक कृतज्ञतेचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे.
ज्या ज्येष्ठ वर्गाने आपल्या अनुभवाच्या आणि संस्कारांच्या शिदोरीवर आजची तरुण पिढी घडवली,दुर्दैवाने कौटुंबिक विवंचने मुळे आज वृद्धाश्रमात एकाकी आयुष्य व्यतीत करणाऱ्या त्याच आदरणीय वृद्धांच्या अमूल्य हस्ते नवी पेठ गणेश मंडळ युवा गर्जना ढोल ताशा पथक तर्फे यंदाचे वाद्यपूजन करण्याचे योजिले आहे.
सर्व मंडळातील सदस्यांनी व नव्या जुन्या वादकांना आग्रहाचे निवेदन उद्या दि.१७ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता मातोश्री आनंदाश्रम सावखेडा शिवार येथे वाद्यपूजनासाठी उपस्थित राहावे.असे आवाहन खान्देशचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीपेठ गणेश मंडळ संचलित युवा गर्जना ढोल ताशा पथका तर्फे करण्यात आले आहे.
वृद्धाश्रमात एकाकी आयुष्य व्यतीत करणाऱ्या वृद्धांच्या हस्ते यंदाचे वाद्यपूजन..युवा गर्जना ढोल ताशा पथका तर्फे आयोजन..
RELATED ARTICLES
