Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरवुमेन्स अँड चाईल्ड केअर संघटने तर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप...

वुमेन्स अँड चाईल्ड केअर संघटने तर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन

जळगांव – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहरातील कष्टकरी कपडे,भांडी  धुणाऱ्या महिलांच्या पाल्यांचा  शैक्षणिक विकास व्हावा त्यांनी त्यातून प्रगतीची झेप घ्यावी या साठी त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्या दृष्टीने संस्थेने अश्या गरजू व आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या  शालेय विद्यार्थ्यांना मदत होण्या दृष्टीने मोफत वही वितरण कार्यक्रमाचे आयोजन मान्यवर अतीथिंच्या  हस्ते करण्यात आले आहे.अश्या गरजू विद्यार्थ्याना प्रोत्साहित करण्यासाठी संस्था  वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असते.चांगला माणूस त्यांच्यात निर्माण व्हावा यासाठी संस्था प्रयत्न करीत असते.त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमातून दि.१३ जुलै रोजी दुपारी २ वाजता मान्यवर अतिथी माजी महापौर सौ.सीमा ताई भोळे, शिक्षणाधिकारी (जि. प) अनिल जोशी (जैन इरी. मीडिया प्रमुख)  यांच्या हस्ते सुमारे ५०० वह्यांचे वाटप या गरजू विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.कार्यक्रम आधार जेष्ठ नागरिक संघ सुरत रेल्वे गेट जवळ, एस एम आय टी कॉलेज रोड येथे दुपारी  २ वाजाता संपन्न होणार आहे.री सर्व  संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देवून विद्यार्थ्याना प्रोत्साहित करावे असे आवाहन वुमेन्स अँड चाईल्ड केअर प्लस संस्थेद्वारे अध्यक्ष सौ.शांता वाणी सचिव छाया पाटील यांनी केले आहे.</strong

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या