जळगांव – १९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) रिंग रोड या प्रमुख रस्त्यावरील देवस्थान समोर अनेक दिवसा पासून कचरा न उचलता झालेल्या अस्वच्छते बाबत शाहू नगर परिसरातील जागृत सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र टेकावडे यांनी सोशल मीडिया वरून दुर्लक्षा बाबत प्रकाशझोत टाकून प्रशासनाला जाब विचारण्यात आला होता.
कचरा कुंड्या शोभेच्या वस्तू आहेत का? त्या वर मनपा प्रशासनाने जनतेच्या पैशातून केलेला खर्च वाया जावू द्यावयाचा का ? देवस्थान समोरील स्वच्छ्ता तसेच सार्वजनिक परिसरात शहरात स्वच्छता नियमित होणे गरजेचे नाही का ? असे अनेक प्रश्न त्यांनी या आवाहनातुन उपस्थित केले होते.
जेथे ही समस्या उद्भवली त्या स्टील कचरा कुंड्या यांना पुष्पहार रांगोळी काढून मनपा प्रशासनाचे तसेच शहर वासियांचे लक्ष वेधले होते.त्या बाबत मनपा प्रशासनाने आज दि.१९ रोजी त्वरित लक्ष घालून त्या परिसरातील स्वच्छ्ता केली.त्या कचरा पेटीतील कचरा सकाळीच भरून नेल्याने परिसरा तील नागरिकांनी व आवाहन करणारे सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र टेकावडे यांनी समाधान व्यक्त करून मनपा प्रशासन आरोग्य विभाग यांचे आभार मानले आहेत.आपली लढाई ही सामाजिक सेवा जनते पर्यंत पोहचावी यासाठी असल्याची प्रतिक्रिया धर्मसाथी लाईव्ह न्यूज शी बोलताना व्यक्त केली.
रिंग रोड हनुमान मंदिर समोरील ती कचरा पेटी अखेर स्वच्छ..सामाजिक कार्यकर्ते यांच्या जागरूक कृतीची मनपा आरोग्य विभागा कडून दखल..
RELATED ARTICLES
