जळगांव – दि.९ स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळा संचलित विठ्ठल-रुक्माई मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
दि. ८ जुलै २०२६ रोजी विठ्ठल-रुक्माई मूर्तींची भव्य मिरवणूक काढून विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदविला.
त्यानंतर दि. ९ जुलै २०२६ रोजी महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळ्याचे श्री गोपाल पवार,श्री अमोल सूर्यवंशी, श्री राजू क्षीरसागर, श्री संजयजी नारखेडे श्री अनिल साठे, श्री राजेंद्र जोशी तसेच इतर सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळा चे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक आणि भाविक भक्त यांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्वांच्या सामूहिक सहभागामुळे हा धार्मिक सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, नागरिकांचे आणि भाविक भक्तांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
राधाकृष्ण नगरात विठ्ठल-रुक्माई मंदिर प्राणप्रतिष्ठा व महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES
