Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरराजमाता जिजाऊ व आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने वन स्टॉप सेंटर कार्यक्रम .....

राजमाता जिजाऊ व आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने वन स्टॉप सेंटर कार्यक्रम .. महिलांना हक्क व उपलब्ध मदतसेवांविषयी मार्गदर्शन..

जळगाव – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शाहूनगर परिसरात राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ, शाहूनगर आणि आदिशक्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वन स्टॉप सेंटरविषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, तसेच हिंसाचार किंवा कौटुंबिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना उपलब्ध असलेल्या मदत व संरक्षण सेवांची माहिती देणे हा होता.

शाहूनगर भागातील महिलांना त्यांच्या हक्का विषयी व उपलब्ध मदत सेवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी वन स्टॉप सेंटरच्या विधी सल्लागार ॲड.राजश्री पाटील,पूजा बडगुजर वर्कर समुपदेशक चित्रा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महानगराध्यक्ष व नगरसेवक दीपक सूर्यवंशी माजी नगरसेवक विजय वाडकर,समाजसेवक हितेंद्र टेकावडे,मयूर मुळीक, भिकन भोई, जानकीराम भोई तसेच महिला मंडळ चेतना मुळीक,नलिनी टेकावडे,रेखा शेळके,किरण चौधरी,दीपा वाडकर, जयश्री मराठे,शितल माळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून महिलांना एकाच छताखाली उपलब्ध होणारे समुपदेशन, वैद्यकीय मदत, पोलीस सहाय्य, कायदेशीर मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार निवारा यांसारख्या सुविधांविषयी माहिती देण्यात आली. महिलांनी कोणत्याही संकटाच्या परिस्थितीत घाबरून न जाता योग्य मदत घ्यावी,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महिलांचे सक्षमीकरण,सुरक्षितता आणि सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ, शाहूनगर आणि आदिशक्ती महिला मंडळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन मिळाले असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या