Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहररक्तदान सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी मुकुंद गोसावी यांचा मध्य रेल्वेच्या इति पांडे याच्या...

रक्तदान सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी मुकुंद गोसावी यांचा मध्य रेल्वेच्या इति पांडे याच्या हस्ते गौरव…

जळगाव – दि.२२(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय निरपेक्ष सेवा कार्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता नियमित रक्तदान,प्लेटलेट्स डोनेशन,रक्तदान शिबिर आयोजक म्हणून दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांचा इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे मध्य रेल्वे भुसावळ येथील डीआरएम.श्रीमती इति पांडे यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी रेडक्रॉस चे उपाध्यक्ष गनिभाई मेमन,रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार जैन,आयएमए अध्यक्ष डॉ.गिरीश गाजरे,सुभाष साखला,विनोद बियाणी, डॉ.ठाकूर , डॉ.मकासरे,डॉ.सुरळकर आदी उपस्थित होते.व्याधीग्रस्त,गंभीर,पीडित, रक्तक्षय तसेच ज्या माता,भगिनी बाळ प्रसूती करता येतात यासह ज्यांना नेहमी रक्त लावावं असे थॅलेसेमिया,हिमोफिलिया आजाराने त्रस्त आदीच्या करिता मुकुंद गोसावी हे आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता आजही रक्तदान क्षेत्रात अग्रणी सहभाग घेत जीवनदान देण्याचं पावन कार्य करत असून आरोग्य विभागाने त्याची रक्तदान जनजागृती कार्याच्या ब्रेन्ड ॲम्बेसेडर ( स्टार प्रचारक) देखील ही निवड केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या