Saturday, September 12, 2026
Homeजळगांव शहरयेसूबाई'चे पुण्यात अभिवाचनाचा शुभारंभाचा प्रयोग

येसूबाई’चे पुण्यात अभिवाचनाचा शुभारंभाचा प्रयोग

जळगांव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)  : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरी पुण्यात सुप्रसिद्ध द बॉक्स हब स्टुडिओमध्ये खानदेश नाट्य प्रतिष्ठान,जळगाव निर्मित लेखिका सुलभा राजीव लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित ‘ श्रीसखी राज्ञी जयति-येसूबाई’या संहितेचा शुभारंभांचा अभिवाचनाचा प्रयोग सादर झाला.

त्यात शरद भालेराव, केतकी भालेराव,अपूर्वा पुराणिक,वर्षा डोंगरे,प्रा राजेंद्र देशमुख,गणेश सोनार,अरुण सानप,जय सोनार या अभिवाचक कलावंतांनी सादर केलेल्या अभिवाचन कार्यक्रमाला पुणेकर आणि जळगावकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हावा अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील दिल्या.

संगीत संयोजन प्रबुद्ध भालेराव यांचे होते तर आयोजनात आदिती-विशाल,प्रसन्न पाध्ये,वृषाली देशपांडे,चंद्रकांत अत्रे,किशोर सुर्वे तसेच द बाॅक्स टीमने उत्तम सहकार्य केले.अत्यंत भावस्पर्शी अशा हा अभिवाचनाचा कार्यक्रम होता. रसिकांसह सर्वांचे मनस्वी आभार सहभागी अभिवाचक कलावंतांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या