Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कामगार आघाडीतर्फे राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कामगार आघाडीतर्फे राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊ वाटप

जळगाव – दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रेमंड कॉलनी येथील जळगाव महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ मध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा),महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, “देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी आणि महाराष्ट्राला प्रगतिशील बनविण्यासाठी युवा पिढीने राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती जोपासल्यास चांगले विद्यार्थी, सुजाण नागरिक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम युवक घडतील.”
कार्यक्रमास माजी उपमहापौर सुनील खडके,नगरसेविका वंदना इंगळे,रंजना वानखेडे,संयोजक पितांबर भावसार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष इंगळे,जिल्हा पदाधिकारी विजय वानखेडे,मनोज भांडारकर,माजी मंडल अध्यक्ष सुनील सरोदे,हर्षल इंगळे,सुदर्शन चालसे,मनोज निंबाळकर,भारत पाटील,ज्ञानेश्वर पाटील, दिलीप चौधरी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी अंबाड, उपशिक्षिका सविता पालवे, ज्योती काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची माहिती भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या