जळगांव – दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
आज दि.२२ रोजी संत मुक्ताबाई श्रीराम पालखी पंढरपूरवरुन जळगाव मुक्कामी परतली.त्या निमित्ताने जळगाव शहरातील एक जुनी आणि प्रतिष्ठित गायन शाळा छाया संगीत साधना तर्फे अभंग भक्ती गीते गायनाचा कार्यक्रम सादर झाला.
पांडुरंगाष्टक सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सौ. रेणुका जोशी, मयुरी हरिमकर,राजेश्वरी रत्नपारखी, निळकंठ कासार, यश देशपांडे, रुपेश पाटील, समिक्षा शिंदे, नितीन गुरव-तबला.या कलाकारांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमाचे नियोजन छाया संगीत साधनाचे संचालक राजेश पुराणिक यांनी केले होते. सुत्रसंचलन राजश्री देशमुख यांनी केले.शेवटी मुकुंद धर्माधिकारी यांनी आभार मानले.
