जळगाव – दि.६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रविवार ८ जून रोजी दुपारी साडेचार वाजता मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे जळगाव बद्दलची निराशा झटकणाऱ्या मुक्काम पोस्ट जळगाव ४२५००१ या टॉक शो अर्थात जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे जळगाव बद्दलचे व्हिजन सादर करणार आहे, तर आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिसंवादाचे संचालन माजी अध्यक्ष गनी मेमन करणार आहेत. जळगाव मधील उच्चशिक्षित तरुणाई बाहेर संधी उपलब्ध असताना देखील ज्यांनी मायभूमीला कर्मभूमी म्हणून संघर्षात उत्कर्ष साधला असे विविध युवा व्यक्तिमत्व या चर्चेत अनुभव कथन करणार आहेत.
जळगावात काय आहे ? असे सांगत नकारात्मक वातावरण तयार करणाऱ्यांसाठी जळगावचे पॉझिटिव्ह पोटेन्शिअल यावेळी मांडण्यात येणार आहे.
नव्या पिढीला प्रेरणा व दिशा देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प सचिव तुषार तोतला यांनी केले आहे.
