Thursday, October 29, 2026
Homeजळगांव शहरमांगल्य सेवा संस्थेमार्फत महाबळ परिसरात गरजूंना धान्य व शिध्याचे वाटप

मांगल्य सेवा संस्थेमार्फत महाबळ परिसरात गरजूंना धान्य व शिध्याचे वाटप

जळगाव – दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) पितृपक्षानिमित्त व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मांगल्य सेवा संस्था,जळगाव यांच्यामार्फत महाबळ परिसर येथे गरजू व निराधार व्यक्तींना धान्य व शिध्याचे वाटप करण्यात आले.पितरांच्या स्मरणार्थ दानधर्माला विशेष महत्त्व असते. त्याच भावनेतून तसेच दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या बांधवांना आधार देण्याच्या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबविला. यावेळी गहू, तांदूळ, डाळ, तेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले शिधा किट गरजूंना देण्यात आले.हे वाटप अनिल तारे,नरेंद्र साखरे,राहुल वाघ, प्रसाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रविण कुळकर्णी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेवाभाव हाच खरा धर्म मानून मांगल्य सेवा संस्था सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे हीच पितरांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.पुढेही अशाच प्रकारे गरजूंसाठी मदत कार्य सुरू राहणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या