Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरमांगल्य सेवा संस्थेतर्फे शिवाजी नगर परिसरात गोसेवा..कै. धोंडोपंत कुळकर्णी (मांगलवाडीकर) स्मृतीप्रित्यर्थ राबवला...

मांगल्य सेवा संस्थेतर्फे शिवाजी नगर परिसरात गोसेवा..कै. धोंडोपंत कुळकर्णी (मांगलवाडीकर) स्मृतीप्रित्यर्थ राबवला उपक्रम..!!

जळगांव :- दि.२१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)शहरातील शिवाजीनगर मांगल्यतीर्थ गोसेवा व अनुसंधान केंद्रातर्फे गो-दत्तक सेवायोजने अंतर्गत संस्थेचे प्रेरणास्थान कै.धोंडोपंत शंकरराव कुळकर्णी मांगलवाडीकर यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त शिवाजीनगर परिसरात पालकत्व स्विकारलेल्या गाईंची सेवा करण्यात आली.याप्रसंगी सुरूवातीला गोमातेचे पुजन करण्यात आले. ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, ब्राह्मण सभेचे संचालक, साप्ता. प्रबोधचंद्रिकेचे संपादक श्री. कमलाकर फडणीस, बळीराम पेठ यांचे प्रमुख उपस्थितीत गोसेवा करण्यात येऊन गाईंना पोषक आहार व चारा,ढेप वितरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी केले.यात गाईंना पोषक आहारात गुळ, चारा, हरभरा डाळ, ढेप, केळीचे पान आहारात देऊन गोसेवा करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.रविंद्र कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या दिशादायी सामाजिक सेवा कार्याची माहिती दिली.संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रविण कुळकर्णी यांनी संस्थेचे प्रेरणास्थान कै.धोंडोपंत कुळकर्णीच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाभिमुख विविधांगी उपयुक्त उपक्रम राबवत असल्याची माहिती देण्यात आली.या सेवेला व्यापक स्वरूप देण्यासाठी संस्था प्रयत्नयशील असून समाजातील दानशूर दात्यांनी या पवित्र गोसेवेसाठी हातभार लावावा असे आवाहन या प्रसंगी केले.प्रमुख आमंत्रित कमलाकर फडणीस यांनी मांगल्य सेवा संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून गोसेवेसाठी सामाजिक हातभार गरजेचा असून पुढील पिढीने या सेवेत सहभागी होण्यासाठी रूची वाढावी असे आवाहन केले.याप्रसंगी मांगल्य सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रविण कुळकर्णी,उपाध्यक्ष रविंद्र कुळकर्णी,सचिव किरण कुळकर्णी,सौ.कल्याणी कुळकर्णी,सौ.प्राची कुळकर्णी, सौ.विणा महाजन तसेच.शिवाजीनगर गोसेवा प्रमुख अविनाश जोशी,सहा.गोसेवा प्रमुख सौ.पुजा जोशी,सेवा सहाय्यक लहानु बारी,विलास महाजन,
श्याम कासार,प्रसाद जोशी,संजय वाघमारे,अथर्व कुळकर्णी,सिध्दांत फडणीस उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या