Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जळगाव आगारात...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जळगाव आगारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..२०० वृक्षांची होणार अभियानात लागवड..

जळगांव – दि.१५ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव आगार येथे प्रथम नागरिक महापौर दिपमाला काळे यांच्या शुभहस्ते,वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी मान्यवरांची व राज्य परिवहन कार्यालय अधिकारी यांची उपस्थिती होती.एकूण ६० रोपांचे वृक्षरोपण जळगाव आगार येथे करण्यात आले.उर्वरित टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात दि.१४ जुलै रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेवर ७८ लाख वृक्षारोपणाचे लागवड करण्याचे मा.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेनुसार आज जळगाव विभागातील जळगाव आगार येथे जळगाव शहराचे प्रथम नागरिक महापौर सौ.दीपमाला काळे,व अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या उपस्थितीत सुमारे दोनशे वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. सदरील वृक्षारोपण जळगाव विभागातील संपूर्ण १५ आगारांमध्ये हा वृक्षरोपणात लागवडीचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक बोरसे,विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,सुरक्षा व दक्षता अधिकारी जाधव, विभागीय कर्मवर्ग अधिकारी नरेंद्र चित्ते, विभागीय सांख्यिकी अधिकारी रवींद्र पवार,जळगाव आगाराचे आगार प्रमुख संदीप पाटील,माझे शहर माझी जबाबदारीचे प्रतिनिधी तथा पर्यावरण दूत रवी नेटके, जिल्हा केमिस्ट संघटना पदाधिकारी निसर्गप्रेमी ग्रुप पदाधिकारी विलास बरडे,एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते,

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या