Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरमन ,बुध्दी शुद्ध करण्याचे साधन सत्संग - श्रीराम प्रवचनकार प.पू.श्री.मदन मोहन महाराज

मन ,बुध्दी शुद्ध करण्याचे साधन सत्संग – श्रीराम प्रवचनकार प.पू.श्री.मदन मोहन महाराज

जळगांव – दि.९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) अर्पण तर्पण,समर्पण ह्या समर्पक अवस्था जीवनात शिकण गरजेचे असून श्रीरामाचे आदर्श कार्य व त्याची प्रेरणा घेवून आपण जगले पाहिजे व आपल्या पुढील पिढीला या बाबत प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याचे परखड मत प.पू.श्री.मदन मोहन महाराज श्रीराम प्रवचनात बोलताना व्यक्त केले.ह्या कार्यक्रमाचे आयोजन झंवर परिवारा तर्फे स्व.श्री.श्यामसुन्दर व स्व.सौ.पुष्पा झंवर ह्यांच्या स्मृती स्मरणार्थ आयोजक मनीष व गिरीष झंवर यांच्या वतीने आनंदनगर हौसिंग सोसायटी येथे दि.८ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले करण्यात आले होते.या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की विज्ञान व धर्म यांच्यातील सांगड घालताना सांगितले की विज्ञान गती देते पण धर्म दिशा देते,राम आदर्श जीवनाची मनुसहिता आहे.त्यांच्या आदर्श वाटचालीची व कार्याची प्रेरणा घ्यावी.कान,डोळे कोणामुळे आपण पाहतो आहे आपणास कोण पहात आहे याचे भान असले पाहिजे.सात्विक आहार महत्व आपणास समजले पाहिजे,गीता वाचली जाते तिथे आपण जन्म घेतला हे आपले भाग्य आहे सात्विक साधक बना शास्त्रांचे अध्यायन केले पाहिजे.परम पुरुष कोण याचा अभ्यास साधकांनी केला पाहिजे.शास्त्र मार्गदर्शन करताना रामाच्या चरणातून गंगा प्रगट झाली.पितर तृप्ती महत्वपूर्ण आहे,राम नाम घेवून परमात्मा प्राप्त करा उपासना करणत्या व्यक्तीला १४ स्थान सांगितले आहे.९ प्रकारची भक्तीचे प्रकार माहीत करून घेतले पाहिजे.चांगले ऐकले नाहीतर विचार कसे बदललतील फळ खराब होऊ नये म्हणून आपण फ्रिझ वापरतो पण मनाचे काय मन खराब होवु नये म्हणुन सद्विचार ग्रहण केले पाहिजे रामचरित मानस,भागवत कथा एक सुंदर रमायन आहे.आनंद को आनंद प्रदान करे ओ रामायण,आनंद बाहेर मिळेल ही फसवी संकलप्ना आहे.धार्मिक गणवेश काही ठिकाणी फसवा झाला आहे.त्यातली शुद्धता ओळखणे भाविक भक्तांना आव्हानात्मक झाले आहे.शाब्दिक साहस झाले पाहिजे,नवे संत,नवे पंथ,गीते पेक्षा कोणतही ग्रंथ वा पंथ श्रेष्ठ नाही.निष्काम कर्म करण्यावर भर दिला पाहिजे.प्रेम गंगाजल आहे वासना दूषित जल आहे. सद आचरण करतो तो धर्म ज्याला हे समजू शकेल त्यालाच राम समजू शकेल.तोटके करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे त्यांनी कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन,प्रवचन कार यांचा परिचय अमोल जोशी तर आभार प्रदर्शन वैष्णवी ताई यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या