जळगाव- दि.१६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील भारत विकास परिषद जळगाव शाखा,महाराष्ट्र उत्तर प्रांत व दिव्यांग केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यापीठामध्ये रविवार १७ मे रोजी सकाळी ११ वाजता शिरसोली रोडवरील सुदर्शन पॅलेस येथे दिव्यांग महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ५४९ दिव्यांग व्यक्तींना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर हात, पाय व कॅलिपर्सचे मोफत वितरण करण्यात येणार आहे असल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने यांनी सांगितले.
यासाठी रॉकेट सॉफ्टवेअर कंपनीने सीएसआर अंतर्गत आर्थिक सहकार्य केलेले आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे,आमदार राजूमामा भोळे, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दुर्गादत्त शर्मा, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी, सेवा गतिविधिचे राष्ट्रीय सल्लागार सहसंयोजक चंद्रशेखर घुसे, दिव्यांग केंद्र पुणेचे अध्यक्ष दत्ता चितळे, विश्वस्त व केंद्रप्रमुख विनय खटावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भारत विकास परिषदेच्या एक हात मदतीचा…. एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे…. या संकल्पाला पाठबळ देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर ५४९ दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर हात, पाय, कॅलिपर्सचे वितरण
RELATED ARTICLES
