Friday, June 5, 2026
Homeजळगांव शहरभारत विकास परिषदेचे दिव्यांगांसाठीचे कार्य निस्वार्थ सेवाभावाचे मूर्तीमंत उदाहरण - जिल्हाधिकारी

भारत विकास परिषदेचे दिव्यांगांसाठीचे कार्य निस्वार्थ सेवाभावाचे मूर्तीमंत उदाहरण – जिल्हाधिकारी


जळगाव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
भारत विकास परिषदेच्या दिव्यांग महाशिबिरातून निस्वार्थ सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण दिसते असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रतिपादन केले.शिरसोली रोडवरील सुदर्शन पॅलेस मध्ये झालेल्या ५४९ दिव्यांग व्यक्तींना आधुनिक मॉड्युलर कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोफत वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरे अनेक ठिकाणी होत असतात, मात्र कोणतीही होर्डिंग अथवा बॅनरबाजी न करता भारत विकास परिषदेने सर्व दिव्यांगांची भोजन, नाष्टा, चहा, जाण्याची – येण्याची व्यवस्था, इतर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची निवास व्यवस्था या सर्व सुविधा मोफत सेवेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या ही विशेष बाब असल्याचे सांगितले.कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दुर्गादत्त शर्मा, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी, दिव्यांग केंद्र पुणेचे अध्यक्ष दत्ता चितळे, केंद्रप्रमुख व विश्वस्त विनय खटावकर, रॉकेट सॉफ्टवेअरचे किरण शीला यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर या मान्यवरांसह सेवा गतिविधीचे राष्ट्रीय सहसंयोजक चंद्रशेखर घुशे, प्रांताध्यक्ष विशाल चोरडिया यांची उपस्थिती होती.
या प्रकल्पासाठी पुणे येथील रॉकेट सॉफ्टवेअर कंपनीने सीएसआर अंतर्गत संपूर्णपणे आर्थिक सहकार्य केले.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख तुषार तोतला यांनी केले. आभार अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने यांनी व्यक्त केले. संपूर्ण वंदेमातरम प्राजक्ता दंडगव्हाळ यांनी तर सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या