Friday, June 5, 2026
Homeजळगांव शहरजळगांव शहरातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना हक्क न्याय मिळण्यासाठी भाजपा कामगार...

जळगांव शहरातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना हक्क न्याय मिळण्यासाठी भाजपा कामगार मोर्चा तर्फे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहरातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना त्याचे हक्क मिळत नाही.तसेच  निश्चित केलेल्या वेळेवर वेतन दिल जात नाही, सुट्टीचे वार्षिक वेतन दिल जात नाही, कंत्राटदार कडून सुरक्षारक्षकांच शोषण केले जाते. कंत्राटदाराच्या या अन्यायाला  रोखून योग्य ती कारवाई करण्यात यावी या साठी जळगांव शहराचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ श्रीमंत.चा.हारकर यांना भारतीय जनता पार्टी च्या वतीने जळगांव जिल्हा महानगर अध्यक्ष श्री प्रशांत जाधव, कामगार मोर्चा प्रदेश सचिव कुमार साईरामे आणि बी.जे.पी संलग्न महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे उप चिटणीस गोपाल पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या