Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरभाजपा केमिस्ट व फार्मसिस्ट आघाडी व जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने सेवा सप्ताह...

भाजपा केमिस्ट व फार्मसिस्ट आघाडी व जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम संपन्न.. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त साजरा होतोय सेवा सप्ताह..

जळगांव – दि.२३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा केमिस्ट व फार्मसिस्ट आघाडी व जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम सीताबाई गणपत भंगाळे विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी शाळेत सरस्वती पूजन व लोकमान्य टिळकांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.भाजपा केमिस्ट व फार्मसिस्ट आघाडी प्रकोष्ठ प्रदेश सह संयोजक जिल्हा केमिस्ट अध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा केमिस्ट संघटना पदाधिकारी ब्रिजेश जैन,दिनेश मालू,विलास बर्डे,समीर गुळवे,साहेबराव भोई,सुरेश पाटील,वैभव तायडे,आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सीताबाई गणपत भंगाळे विद्यालय (माध्यमिक ) मुख्याध्यापक नरेंद्र कुमार बोरसे,प्रार्थमिकचे मुख्यधापक प्रफुल्ल सरोदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका विजया चौधरी, अनुपमा कोल्हे,ईशा महाजन (माध्य),विजय कुमार नारखेडे,भूषण भोळे,प्रशांत भारंबे, दिपनंदा पाटील,स्वाती पगारे,सारिका महाजन,प्रिया वारके आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या