जळगांव – दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
ब्राह्मण सभा महिला समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ब्राह्मण सभा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आयोजनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून भुसावळ येथील उद्योजका सुनीता जोशी होत्या.दिप्रज्वलन वैदेही नाखरे, सुनीता जोशी, श्रद्धा कुलकर्णी, सोनिका मुजुमदार आरती गोडबोले ह्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक महिला आणि सांस्कृतिक प्रमुख वैदेही नाखरे ह्यांनी केले.सुनीता जोशी ह्यांनी उद्योग प्रवास आणि महिलांना उद्योगाविषयी मार्गदर्शन केले.
हया वेळी काळाच्या पडद्याड गेलेली पत्रलेखन कला “माझं पत्र वाचन”आयोजित करण्यात आली होती. एकूण 35स्पर्धाकांनी ह्यात सहभाग नोंदवला.स्पर्धेचे परीक्षण सोनिका मुजुमदार आणि भारती गोडबोले ह्यांनी केले.विजेते स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली यात प्रथम -रुपाली जोशी,द्वितीय -स्मिता शुक्ल तृतीय -आसावरी जोशी,उत्तजनार्थ प्रथम -नेहा रस्से,उत्तजनार्थ द्वितीय -पल्लवी देसाई,उत्तजनार्थ -तृतीय -उत्तरा कुलकर्णी.सूत्रसंचालन मीनाताई जोशी, यांनी तरआभार प्रदर्शन श्रद्धा शुक्ल ह्यांनी केले.कार्यक्रमा नंतर महिलाना अल्पोपहार देण्यात आला.वृषाली व्यवहारे ,स्वप्नगंधा जोशी,श्रद्धा कुलकर्णी,रेवती कुरुंभट्टी ह्या महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
ब्राह्मण सभा महिला समितीच्या वतीने महिला दिन साजरा.. उद्योगाविषयी दिले मार्गदर्शन..
RELATED ARTICLES
