जळगाव :- दि.२१ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) बीव्हीजी कंपनीचे चालक अविनाश चौधरी आणि हेल्पर सुरेश जाधव यांनी प्रामाणिकपणाचे आदर्श घेण्यासारखे उदाहरण घालत कचऱ्यात हरवलेले सुमारे सात ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने शोधून मालक शिवाजी बाबुराव वंजारी यांना परत केले.या प्रामाणिक वृत्तीचे शहरात सर्वदूर कौतुक होत आहे.अनेक जण त्यांचे अभिनंदन करत आहे.
वार्ड क्रमांक १९ मधील कचरा संकलनादरम्यान दागिने चुकून कचऱ्यात गेले होते.माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी नेरे नाका येथील झोनमध्ये संपूर्ण कचरा तपासून दागिने शोधले. मुख्य स्वच्छता निरीक्षक कुणाल बारसे,सुपर वायझर नीरज पाटील आणि व्यवस्थापक विनोद रेड्डी यांच्या उपस्थितीत दागिने मालकाकडे सुपूर्द करण्यात आले.या प्रामाणिकपणाबद्दल दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
बीव्हीजी कंपनी चालक व हेल्परचा प्रामाणिक पणा..कचऱ्यात हरवलेले सोन्याचे कानातले केले मालकाला परत..
RELATED ARTICLES
