जळगाव : दि.२४(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
येथील गंधार कला मंडळ आणि म्हाळस परिवारातर्फे गुरुवार, दि.२६ जून रोजी “बालगंधर्व एक नक्षत्र” ही बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त मैफिल होणार आहे.
या मैफिलीत युवा गायिका सिद्धी आणि धनश्री कुलकर्णी ( पाचोरा ) या भगिनी शास्त्रीय संगीत आणि बालगंधर्वांची काही अजरामर नाट्यगीते व अभंग सादर करून मैफिल सजवणार आहे. सिद्धी आणि धनश्री या संगीत विशारद करत असून अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे. धनश्री हिने ॲन्ड टिव्ही तर्फे झालेल्या स्पर्धेत देशातून प्रथम क्रमांक मिळवून गोल्डन ट्रॉफी तसेच ५०००० चे बक्षीस मिळवले आहे.
गुरूवारी सायंकाळी ५ वाजता होणारी ही मैफिल बळीराम पेठेतील हेमंत म्हाळस, आसरा संकुल, बळीराम मंदिराजवळ येथे होणार आहे.
बालगंधर्व हे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे मामा आबासाहेब म्हाळस यांच्या बळीराम पेठेतील निवासस्थानी गायनाचे धडे गिरवले होते.
त्याच ठिकाणी ही मैफिल होणार आहे. तरी सर्व रसिकांनी या मैफिलीस उपस्थित राहावे, असे आवाहन गंधार कला मंडळ आणि म्हाळस परिवारातर्फे करण्यात आले आहे.
“बालगंधर्व एक नक्षत्र” मैफिल गुरुवारी
RELATED ARTICLES
