जळगांव – दि.१६ ( धर्मसाथी मीडिया नेटवर्क) बळीराम पेठ वस्तीत दि.१५ रोजी संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत ब्राम्हण सभेच्या हाॅलमध्ये हिंदूमेळाव्या संदर्भात व्यापक संघटन व नियोजन स्वरूपात बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीला कार्यकर्त्यांचा रहिवाश्यांच्या मोठा प्रतिसाद लाभला.
याबैठकीत अनेक नवे,जुने,जेष्ठ समाजबांधव ,कार्यकर्ते एकत्रित येवून त्यांनी दि.२८ मार्च रोजी बळीराम पेठ परिसरात भव्य स्वरूपात आयोजित होणाऱ्या सकल हिंदू मेळावा मोठ्या व विक्रमी संख्येने यशस्वी करण्यासाठी निर्धार व्यक्त केला.याबैठकीत सकल हिंदूमेळावा आयोजन यशस्वी करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यात अध्यक्षपदी सौ शंताताई वाणी,उपाध्यक्षपदी अमृत सूर्यवंशी, डॉ.कुणाल महाजन, कोषाध्यक्षपदी नितेश पानसर ,यांचेसह विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
या मेळावा आयोजनात परिसरातील सर्व भागात चैतन्य निर्माण व्हावे या दृष्टीने प्रमुख चौकात ,बॅनर,झेंडे लावून सजावट करणे भव्य शोभायात्रा काढून परिसरात हिंदू बांधवांचा उत्साह वाढवण्या साठी तसेच लहान मूल,मुलींना युवक, युवतींना , आपल्या संस्कृतीची ओळख देणाऱ्या वेशभूषेत विविध आदर्श असलेल्या साधू,संत,देव,महापुरुष रूपातील भूमिका साकारून सामाजिक एकतेचा संदेश देण्याबाबत मेळाव्यातील आयोजनात सहभाग करण्या बाबत विचार विनिमय करण्यात आला.
यात कुटुंबियातील पाल्यांना सहभागी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.तसेच महिलांना देखील हिंदू मेळावा आयोजनात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले . मेळावा प्रचार प्रसार,संदेशपत्र,निमंत्रण पत्रिका वितरण रोज सायंकाळी समिती सदस्यांचे माध्यमातून घरोघरी जावून केले जाणार आहे.
पुढील नियोजन बैठकीची रूपरेषा निश्चित करून बळीराम मंदिरात त्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.सकल हिंदू समाज समिती तर्फे सामूहिक गुढीपाडवा उत्सव साजरा करताना गुढी उभारण्यासाठी सकाळी ११ वाजता बळीराम पेठे तील (कारंजा)
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात एकत्रित येण्याचे संदर्भात उपस्थितांना व रहिवाश्यांना आवाहन करण्यात आले आहे.या बैठकी प्रसंगी बळीराम पेठ वस्तीतील विविध क्षेत्रातील सर्व हिंदू समाजबंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
बळीराम पेठ परिसरात सकल हिंदू मेळावा आयोजन समिती बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
RELATED ARTICLES
