जळगांव – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) बळीरामपेठ परिसरातील नागरीकांच्या मतदार यादी पूनरिक्षणासाठी मदत शिबिराचे दि.११ जुलै रोजी ब्राह्मण सभेत सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिक,मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन ते अडीज हजार मतदारांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
भारत सरकार तर्फे मतदार यादी तपासणी व सखोल पूनरिक्षणाचे काम सद्या सुरू आहे.या राष्ट्रीय कार्यात मतदारांना, नागरिकांना मार्गदर्शन व्हावे व ही प्रक्रिया सूलभतेने पार पडावी यासाठी बळीराम पेठेतील ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात स्वराज मित्र मंडळ व आझाद क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शनिवार दि ११ रोजी या“मतदार यादी पूनरिक्षण शिबीरात”बळीरामपेठ परिसरातील प्रभाग ५ बूथ क्र.५३,५४,५५ आणि ५६,५७,५८ यासह शनीपेठ प्रभाग ४ व ५ बूथ मधील विविध यादीतील मतदारांची सखोल पडताळणी करण्यात आली त्यांना दिलेले फॉर्म यादी क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक,२००२ मतदार यादीतील क्रमांकासह भरून घेण्यात आले तसेच त्यांचे छायाचित्र लावून फॉर्म भरण्यात आला. या वेळी संबंधित बूथ चे शासकीय बी.एल.ओ.उपस्थित होते.
शिबिर यशस्वी केल्याबद्दल मतदारांचे बी.एल.ओ व परिसरातील नागरिकांचे आभार स्वराज मित्र मंडळाचे वतीने मानण्यात आले.
मान्यवरांच्या भेटीने कार्यकर्ते उत्साही
या प्रसंगी आ.राजू मामा भोळे,प्रभाग ५ नगरसेवक विष्णू भंगाळे,नगरसेविका आशा पाटील,महेश पाटील, भाजपा महानगर पदाधिकारी एस आय आर महानगर संयोजक राहुल वाघ,पदाधिकारी महानगर सरचिटणीस नितीन इंगळे,भाजपा महानगर उपाध्यक्ष उदय भालेराव मंडळ कर्माक १ आनंद सपकाळे यांनी भेट देवून मतदारांच्या अडी अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमाला यशस्वी करण्यकामी भाजप माजी मंडळ अध्यक्ष व स्वराज्य मित्र मंडळ अध्यक्ष राहुल घोरपडे,प्रभाग ४ भाजपा नगरसेवक नगरसेवक कल्पेश सोनवणे,प्रभाग ४ भाजपा नगरसेविका शशिकला शिवचरण ढंढोरे,संदीप ढंढोरे, प्रमोद निकुंभ,प्रदीप कुलकर्णी,शिवाजी पवार,उमेश देशपांडे,निलेश पाटील,बूथ प्रमुख गजानन परदेशी, भाजपा युवा मोर्चा चिटणीस अमित माळी,नितेश पानसर,प्रेमल पटेल, अमित कल्याणी ,विकास पिंगळे,आदींनी परिश्रम घेतले.
