Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरबळीरामपेठ परिसरातील नागरीकांच्या मतदार यादी पूनरिक्षणासाठी मदत शिबिराचे दि.११ जुलै रोजी आयोजन..

बळीरामपेठ परिसरातील नागरीकांच्या मतदार यादी पूनरिक्षणासाठी मदत शिबिराचे दि.११ जुलै रोजी आयोजन..

जळगांव — दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
भारत सरकार तर्फे मतदार यादी तपासणी व सखोल पूनरिक्षणाचे काम सध्या सुरू आहे.या राष्ट्रीय कार्यात मतदारांना,नागरिकांना मार्गदर्शन व्हावे व ही प्रक्रिया सूलभतेने पार पडावी यासाठी येत्या शनिवार दि.११ जुलै रोजी बळीराम पेठेतील ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात स्वराज मित्र मंडळाचे वतीने शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार दि ११ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत चालणाऱ्या या “ मतदार यादी पूनरिक्षण शिबीरात” बळीरामपेठ परिसरातील बूथ क्र.५३,५४,५५ आणि ५६,५७,५८ या बूथ मधील मतदारांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.या वेळी संबंधित बूथ चे शासकीय बी.एल.ओ. उपस्थित राहाणार आहेत.तरी बळीरामपेठ परिसरातील नागरिकांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत व १ रंगीत फोटो सह समक्ष उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज मित्र मंडळाचे वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या