Friday, June 5, 2026
Homeकृषीपानी फाऊंडेशन व तालुका कृषि अधिकारी यांचा संयुक्त उपक्रम..आज फार्मर कप स्पर्धा...

पानी फाऊंडेशन व तालुका कृषि अधिकारी यांचा संयुक्त उपक्रम..आज फार्मर कप स्पर्धा साठी जळगाव तालुक्याची आढावा व नियोजन बैठक..

जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
पानी फाऊंडेशन आणि तालुका कृषि अधिकारी जळगाव यांचा संयुक्त उपक्रम फार्मर कप स्पर्धा यासाठी जळगाव तालुक्याची आढावा व नियोजन बैठक आज दि.८ मे सकाळी १० वाजता आयोजित केली आहे.पंचायत समिती सभागृह हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व मेंटर (कृषी विभाग ,उमेद )तसेच सर्व निमंत्रकांना आमंत्रित केले आहे. ही बैठक फार्मर कप स्पर्धा २०२६ साठी खुप महत्वाची असून पुढील नियोजन करण्या साठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या बैठकीसाठी कृषी विभाग,उमेद अभियान तसेच पानी फाउंडेशनचे वरिष्ठ अधिकारी सुध्दा उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व निमंत्रक आवर्जून उपस्थित रहावे तसेच ज्यांनी पानी फाउंडेशन चे निवासी प्रशिक्षण घेतले नाही पण या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे त्या गटाचे सदस्य यांना आमंत्रित करण्यात येत आहे. व त्यांना संपुर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी सर्व शेतकरी बंधू कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या