Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरपर्यावरण संरक्षणासाठी विविध संस्था व पर्यावरणप्रेमींची महत्त्वपूर्ण बैठकीचे ९ रोजी आयोजन..

पर्यावरण संरक्षणासाठी विविध संस्था व पर्यावरणप्रेमींची महत्त्वपूर्ण बैठकीचे ९ रोजी आयोजन..

जळगाव – दि. ४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) पर्यावरण संरक्षण गतिविधी,जळगाव यांच्या वतीने शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक,पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था,स्वयंसेवी संस्था(NGO) तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार,दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक गायत्री मंदिर, राधाकिसनवाडी, बालगंधर्व नाट्यगृहाजवळ,जळगाव येथे होणार असून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांवर चर्चा,विविध संस्थांमधील समन्वय वाढविणे तसेच संयुक्त कृती आराखडा निश्चित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.

बैठकीत शहरातील पर्यावरणविषयक विविध उपक्रमांना अधिक गती देणे,सामाजिक संस्थांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सर्व संस्था,स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहून आपल्या मौल्यवान सूचना व सहकार्य द्यावे,असे आवाहन पर्यावरण संरक्षण गतिविधी,जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी या ९८९०४५६९७६ क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या