Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरपद्मश्री भवरलाल व कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने यादव गोल्ला गवळी...

पद्मश्री भवरलाल व कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने यादव गोल्ला गवळी समाज सभेच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थ्याना वह्यांचे वितरण

जळगांव – दि ८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
पद्मश्री भवरलाल व कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने यादव गवळी समाज सभेच्या उत्स्फूर्त आयोजनातून ओक मंगल कार्यालय येथे शनिपेठ, गुरुनानक नगर,दाल फड, रिधुरवाडा, चंदनवाडी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम रविवारी दि.६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.त्यात मान्यवर अतिथी यांच्या हस्ते वह्यांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना शिंदे गट महानगर अध्यक्ष संतोष पाटील,नगरसेवक मुकुंदा सोनवणे,माजी नगरसेवक अशोक जैन,मोहन गवळी,जितेंद्र बागरे,मनोज गवळी ,शिवसेना उबाठा महानगर अध्यक्ष शरद तायडे, राजेंद्र खरारे,हरीश धंजे गुरुजी आदीं मान्यवर व्यासपीठावरउपस्थित होते.या कार्यक्रमाला संतोष गवळी,राधेश्याम देशमुख,कन्हैया गवळी,मनोज सोनवणे वसंत गवळी, प्रमोद चांगरे,प्रदीप जावळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या