जळगांव – दि.१६(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
दि.१७ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा केमिस्ट संघटना वतीने सामान्य जनांच्या सेवेसाठी शितशव पेटी लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे.
या पूर्वी देखील जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभरात विविध तालुक्यात शित शवपेटी वितरण उपक्रम राबवण्यात आला आहे.
उद्या दि.१७ रोजी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वाटचालीत सदैव खंबीर साथ,मार्गदर्शन देणारे महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक,आरोग्य दूत ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवस जिल्हा केमिस्ट संघटने तर्फे सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जात आहे.
जिल्हाध्यक्ष केमिस्ट भूषण सुनिल भंगाळे,सचिव अनिल झंवर यांच्या मार्गदर्शना खाली जळगांव जिल्हा व तालुकापदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे शितशव पेटी लोकार्पण
RELATED ARTICLES
