Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरना.गिरीश महाजन यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार...भाजपा महानगर व...

ना.गिरीश महाजन यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार…भाजपा महानगर व जिल्हा तर्फे आयोजन..

जळगांव – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)भाजपा जळगाव महानगर जिल्हाच्या वतीने संकट मोचक महाराष्ट्राचे नेते राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या “वाढदिवसानिमित्त” दि.१७ रोजी विविध सामाजिक उपक्रम शहरासह जिल्हाभरात आयोजित केले आहेत. खा.रक्षाताई खडसे(केंद्रीय राज्यमंत्री),खा.स्मिताताई वाघ,आ.सुरेश दामु भोळे (राजुमामा) आमदार जळगाव शहर, दीपक सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष महानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.रुग्णांना अन्नदान व फळ वाटप” सकाळी १०:३० वाजता,सेवालय सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे त्यासह रुग्णांना फळ वाटप” सकाळी १०:४५ वाजता सिव्हिल हॉस्पिटल जळगाव, रक्तदान (युवा मोर्चाच्या तर्फे सकाळी ११:०० वाजता भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले असून भारतीय जनता पार्टी भाजपा जळगाव महानगर चे सर्व जिल्हा/मंडल पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा व मंडळ पदाधिकारी मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते, या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या