जळगांव – दि.२१ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दि.२० रोजी बळीराम पेठ येथील शीतला माता मंदिर येथून देशाच्या जवानांच्या सन्मानार्थ भाजपा महिला आघाडीने काढलेल्या सिंदूर यात्रेची सुरुवात खा. स्मिताताई वाघ,आ. राजू मामा भोळे,दीपक सूर्यवंशी,माजी महापौर सीमा भोळे, रेखा वर्मा,भारती सोनवणे यांच्या नेतृत्वात भारत माता व राजमाता,राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर’यांच्या प्रतिमेला”कुंक सिंदूर लावून पूजन करून या सिंदूर यात्रेची सुरुवात करण्यात आली..
होती.शहर वासियांचे या भव्य यात्रेने लक्ष वेधले गेले.
या यात्रेसाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्था बहुभाषिक ब्राह्मण महिला संघ, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महिला संघटन, भारतीय सिंधी सभा,लीनेस क्लब जळगाव,उमाळेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ,सुरभी बहुउद्देशीय संस्था, अशा संस्थांच्या महिला पदाधिकारी व जळगावकर महिला माता-भगिनी मोठ्या संख्येत सहभागी झाले.
तर कार्यक्रमासाठी रेखा कुलकर्णी, दीप्ती चिरमाडे,दीपमाला काळे,सुचिता हाडा,गायत्री राणे, सुरेखा तायडे,रंजना वानखेडे,यांची उपस्थिती होती.नीतू परदेशी,उषा पाठक,नीला चौधरी,सरोज
पाठक, उषाताई पाठक,नंदिनी दर्जी,संगीता पाटील, भाग्यश्री चौधरी,वंदना पाटील,रेखा पाटील,शुभांगी बिराडे,ज्योती पालीवाल,नंदिनी राणा,दीपिका खैरनार, माधुरी देशमुख यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी महेश जोशी,विशाल त्रिपाठी,अजित राणे,राहुल वाघ,विनोद मराठे,धीरज वर्मा,उमेश देशपांडे,संजय शिंदे यांचे सहकार्य लाभले.
ऑपरेशन सिंदुर च्या अंतर्गत आपल्या सशस्त्र दलातील सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले.तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठिकाणी हल्ले करून नुकसान केले आहे. भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल व त्यांच्या सन्मानार्थ सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहरातील सर्व माता भगिनी व महिलांनी मोठ्या संख्येने कपाळावर मोठ “कुंकू (सिंदुर),हिरव्या बांगड्या, लाल साडी,पोशाख” परिधान विशेष लक्षवेधी ठरले.
यात्रेला सुरुवात ब्राह्मण सभा,बळीराम पेठ येथून होवून बळीराम पेठ,प्रकाश मेडिकल,चौबे शाळा नेताजी सुभाष चौक यात्रा समारोप झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक,बेंडाळे चौक येथे राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पहेलगाम येथील सर्व शहिदांना,तसेच सीमेवर शहिद होणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली देत यात्रेचा समारोप करण्यात आला.असे आयोजकांकडून रेखाताई वर्मा लिनेस (लायनेस) क्लबच्या सचिव यांनी कळविले आहे.
____________________________________
