जळगाव :- दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न थेट जाणून घेण्वयासाठी शिवसेनेतर्फे ‘शिवसंवाद दौरा – जिल्हाप्रमुख आपल्या दारी’हा उपक्रम राबविण्यात आला.जळगांव ग्रामीण भागात शेतकरी बांधवांच्या दारी जावून संवाद साधण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत दि.३० सप्टेंबर रोजी आव्हाणे ,खेडी, वडनगरी,फुफनगरी,कानलदा तसेच ,१ ऑक्टोंबर रोजी कठोरा,भोकर,पडसोद,जामोद आमोदे,गाडोदा,देवगाव ,फुकणी,नंदगाव,पैसार्डी पिलखोडअश्या गावांना भेटी देवून शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. यावेळी पिकांची परिस्थिती,पाण्याची उपलब्धता, शेतरस्ते तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली.
यावेळी जि.प.सदस्य प्रताप पाटील, शांताराम नाना, अनिल भोळे,जनाआप्पा,डॉ.कमलाकर पाटील,जितू पाटील, गजानन सोनवणे,चेतन पवार,स्वप्नील सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
