Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरसंत तुकाराम बीज निमित्त स्वर वेध प्रस्तुत अभंग रचना व भक्तीगीत गायन...

संत तुकाराम बीज निमित्त स्वर वेध प्रस्तुत अभंग रचना व भक्तीगीत गायन कार्यक्रम..भाऊंच्या उद्यानात दि.५ रोजी आयोजन..

जळगांव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) संत तुकाराम बीज निमीत्त पंडित संजय पत्कीज स्वर स्वामी गुरुकुल आग्रा घराणा संचलित स्वर वेध फाऊडेशन प्रस्तुत महाराष्ट्रातील थोर संत जगतगुरु संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत एकनाथ,संत जनाबाई,संत कैकाडी महाराज सह इतर संतांच्या विठू माऊली वर आधारित अभंग रचना व भक्ती गीतांचा कार्यक्रम उद्या दि.५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.“विठू माझा चंदनाचा कंद’या अभंग गायन कार्यक्रमात इंजि.भागवत पाटील,किशोर मोरे,निळकंठ कासार,सौ.अंजली धुमाळ, इंजि.सुनिल पाटील,रमेश पहेलानी,बापूसाहेब पाटील,श्रीमती ज्योती पाटील हे अभंग गीतांचे,भक्तिगीते सादर करणार आहेत.श्री सुशील महाजन( हार्मोनियम) तबला,प्रविण महाजन , यांची साथ संगत लाभत असून निवेदन-श्रीमती ज्योती राणे-पाटील यांचे असणार आहे. साऊंड व्यवस्था विजय साऊंड सर्व्हिस,महाबळ जळगांव(विजय जोशी) हे सांभाळणार आहेत.</strong मार्गदर्शन-गुरुवर्य पंडीत संजय पत्की,स्वरस्वामी गुरुकुल(आग्रा घराणा)जळगांव प्रा.दुष्यंत जोशी,ओंकार संगीत साधना,जळगांवया कार्यक्रमासाठी आमदार राजूमामा भोळे,जळगांव शहर,सौ.दीपमाला मनोज काळे,महापौर,मनपा जळगांव,मनोज चौधरी,उपमहापौर,मनपा जळगांव डॉ.चंद्रशेखर शिवाजी पाटील (स्थायी समिती सभापती,मनपा,जळगांव)बंडूदादा काळे,माजी नगराध्यक्ष,मनपा,जळगांव सुनील वामनराव खडके,माजी उपमहापौर व नगरसेवक ,मनपा,जळगांव डॉ.नरेंद्र धुडकू ठाकूर, नगरसेवक,न.पा एरंडोल, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा वैद्यकीय आघाडी ग्रामीण इंजि.सुनिल भास्करराव पाटील,सुनिल बी.पाटील अॅण्ड कंपनी,जळगांव गव्ह.कॉन्ट्रॅक्टर तुकाराम पाटील (निवृत्त,सहा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी), मुकुंद माळी,(निवृत्त महावितरण अधिकारी) कैलास सोनार, (निवृत्त ट्रेझरी ऑफिसर),डॉ.नरेंद्र सोनार (होमिओपॅथी) यांचे सौजन्य व उपस्थिती लाभत आहे.भाऊंचे उद्यान,महाबळ रोड,काव्य रत्नावली चौक,अम्पी थिएटर,जळगांव गुरुवार,दि.५ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.ए.बी.कॉन्ट्रक्टस् ऑल सिव्हील इंजीनिअरींग वर्क्स,टाऊन प्लॅनींग अँड कन्स्ट्रक्शन वर्क्स,गव्ह, कॉन्ट्रक्टर यांचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभत आहे.अध्यक्ष इंजि.भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पना-किशोर मोरे स्वरवेध फाऊंडेशन,जळगांव ह्यांनी हे बहारदार अभंग गायन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.कार्यक्रम सर्व रसिक भक्तांसाठी खुला व विनामूल्य आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या