Sunday, September 13, 2026
Homeजळगांव शहरडॉ.भोकरडोळेंच्या पुस्तकाचा'उमवि'च्या अभ्यासक्रमात समावेश..

डॉ.भोकरडोळेंच्या पुस्तकाचा’उमवि’च्या अभ्यासक्रमात समावेश..

 जळगाव दि.२१ : (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)  येथील डॉ.संजय भोकरडोळे यांनी लिहिलेल्या ‘आठवणी स्वातंत्र्य सैनिकांच्या’या पुस्तकाची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दखल घेतली असून या पुस्तकाचा समावेश कला शाखेच्या द्वितीय वर्ष इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे.शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासूनच त्यांचे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे.द्वितीय वर्ष इतिहास विषयाच्या सेमिस्टर 3 ‘मध्ये ट्रॅडिशन अँड कल्चर इन खानदेश’ या विभागात डॉ. भोकरडोळे यांच्या पुस्तकाचा समावेश आहे.विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची दोन महिन्यापूर्वी बैठक झाली होती. या अभ्यास मंडळाने डॉ. भोकरडोळे यांचे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत शिफारस करून ठराव केला होता. खानदेशच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती देणारे हे पुस्तक असल्याने ते विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, असे विद्यापीठाने म्हटले आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये ‘आठवणी स्वातंत्र्यसैनिकांच्या’ हे पुस्तक खानदेशच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत उपयुक्त पुस्तक असल्याने अधिकृत संदर्भ ग्रंथ म्हणून विद्यापीठाने मान्यता दिली होती व त्याबाबतचे परिपत्रक देखील काढले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या