जळगांव – दि १९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल विजयी भव: सत्कार समारंभाचे आयोजन झंवर कुटुंबीयांच्या वतीने दि.१८ रोजी सायंकाळी करण्यात आले होते.त्या आयोजन सोहळ्याला स्नेहिजनांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी महायुतीच्या विजयाचा जल्लोष साजरा करत लोकप्रतिनिधींचा व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे,भागवत भंगाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक दीपक सूर्यवंशी, नितीन बरडे,आशाताई पाटील, सुचिता हाडा, दीपमाला काळे, अंकिता पाटील,मंगला चौधरी, विशाल भोळे,चंद्रशेखर अत्तरदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महायुतीच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, आगामी काळात शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. झंवर कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात पार पडला.झंवर परिवारातर्फे मनीष व गिरीश झंवर यांचेसह सर्व कुटुंबीय व सर्व मित्र परीवाराने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
झंवर परिवारातर्फे अभिनंदन सोहळ्यात झाला नगरसेवकांचा भव्य सत्कार..स्नेहीजनांची मोठी उपस्थिती..
RELATED ARTICLES
