जळगाव | दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगाव जिल्हा व तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ केमिस्ट सुपे मामा तसेच जळगाव तालुका कोषाध्यक्ष दीपक चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे,दिनेश मालू, शामकांत दादा वाणी, संजय पाठक,नरेश मंधान, खालिद सय्यद, समीर गुळवे,विलास बर्डे,कुंदन बोरसे, निलेश नाईक,भूषण महाजन, राहुल जगताप तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुपे मामा आणि दीपक चौधरी यांना उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य, सुख, समृद्धी तसेच औषध व्यवसाय आणि समाजसेवेत निरंतर यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा जळगाव जिल्हा व तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आल्या.
