जळगाव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने पाचोरा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात महापुरात शैक्षणिक नुकसान झालेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या १६२ पूरग्रस्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या व पेन अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
हे सर्व साहित्य संबंधित संस्थेचे चेअरमन,संजय वाघ, व्हा.चेअरमन, व्ही.टी.जोशी ,ज्येष्ठ संचालक,सतीश चौधरी,ज्येष्ठ संचालक डॉ.जयंत पाटील,आणि जळगाव येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.देवेंद्र इंगळे,मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता व इंग्रजी विभाग प्रमुख,प्रा.डॉ.भूपेंद्र केसुर,प्रा.डॉ.जुगलकिशोर दुबे,प्रा.डॉ.विजय लोहार तसेच एम.एम.कॉलेजचे प्राचार्य,प्रा.डॉ.शिरीष बी.पाटील,उपप्राचार्य प्रा.डॉ.वासुदेव एस.वले व उपप्राचार्य प्रा.डॉ.जे.व्ही.पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.त्यासोबतच मु.जे, महाविद्यालयाकडून पाचोरा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाला विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी UPSC/MPSC सामान्यज्ञान मार्गदर्शनाची काही पुस्तकेही भेट देण्यात आली.
केसीई सोसायटीचे अध्यक्ष,श्री.नंदकुमार.जी.बेंडाळे यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य,प्रा.डॉ.एस.एन.भारंबे यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला. या वाटप कार्यक्रमावेळी अध्यक्ष संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांना खचून न जाता नवीन प्रेरणा घेऊन जिद्दीने अभ्यास करून अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाकडून मा. प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी विद्यार्थ्यांना अश्या संधीचे सोने करून अभ्यास व जिद्दीच्या प्रयत्नातून पुढे मार्गक्रमण करावे असा संदेश दिला.
मु.जे.महाविद्यालयाच्या वतीने पाचोरा एम.एम. कॉलेजमधील पूरग्रस्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय वस्तू आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप..
RELATED ARTICLES
